★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-
१) पोहचाल कसे?
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील वणी ह्या गावी आपण प्रथम जावे आणि तेथून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबापूर नावाच्या गावी पोहचावे. ह्या गावालगत मुलनबारी नावाची खिंड आहे ह्या खिंडीतून मार्कंडेय पर्वताच्या पायऱ्या सुरू होतात.
२) किल्ल्याची उंची:-
समुद्र सपाटीपासून ४३८३ फूट उंच
३) किल्ल्याची श्रेणी:-
मध्यम स्वरूपातील
४) डोंगररांग:-
सातमाळ
५) इतिहास:-
अलीवर्दी खानाने इ.स. १६३९ मध्ये औरंगजेबाच्या आदेशाचे पालन करत नाशिक जिल्यातील ह्या डोंगररांगेतील सर्व किल्ले जिंकले ज्यांचा उल्लेख इंद्राई किल्ल्यावरील शिलालेखात आढळतो. ह्यात मार्कंड्या किल्ल्याचा देखील समावेश होतो. वणी-दिंडोरीच्या लढाईत शिवाजी महाराजांनी ह्या परिसरातील सर्व किल्ले जिंकून घेतले आणि नंतर १८१८ मध्ये हे किल्ले ब्रिटिशांनी ताब्यात घेतले.
६) किल्ल्यावर काय काय पाहणार?
वनविभागाने तयार केलेल्या पायऱ्या आणि काही लोखंडी जिने चढत आपण पहिल्या टप्प्यावर पोहचतो. हा टप्पा म्हणजे किल्ल्याची माची आहे. इथून पुढे कातळकडा लागतो, तिथे देखील रेलिंग बसवलेली आहे. कातळकड्यात पायऱ्या आहेत. थोडस चढून गेल्यावर आपल्याला डाव्या हाथाला २ गुंफा दिसतात, चौकोनी आकार आणि छोटासा enterance असलेल्या ह्या गुहा “ध्यान गुहा” म्हणून ओळखल्या जातात. येथून पुढे असलेल्या एका घळीतून आपल्याला सप्तशृंगी गड दिसू लागतो. पुढे अजून काही कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत. ह्या चढून आपण बालेकिल्ल्यावर पोहचतो.
इथे एक काळ्या दगडात गणपतिची मूर्ती ठेवलेली आहे. उजव्या हाथाला पाण्याच्या टाक्या आहेत ४, पुढे एक घुमटाखली पाण्याची टाकी आहे तिला कमंडलू तीर्थ म्हणतात. आणि आपण पोहचतो ते सर्वोच्च टोकावर इथे मार्कंड्या ऋषींचे मंदिर आहे.
सर्वोच्य टोकावरून आपल्याला सप्तश्रृंगी गड, मोहनदर, अहिवंत, धोडप , रवळ्या-जवळ्या ही किल्ले दिसतात.
★महत्वाची टीप :-
ह्या किल्ल्याला काही लोक सप्तश्रृंगी गडाकडून असलेल्या वाटेने येतात जी की खूप रिस्की आहे. त्यामुळे येताना नक्की मुलनबारी ह्या घळीकडून या, आणि पिण्याच्या पाण्याची सोय करूनच येणे.
★काही क्षणचित्रे:-
आपल्या मार्कांड्याच्या YOUTUBE व्हिडिओची लिंक:-
No comments:
Post a Comment