Monday, January 25, 2021

किल्ले रतनगड

नेहमी सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्या फिरताना सवंगड्यांच्या तोंडून रतनगडाच कौतुक ऐकलं होतं. म्हणून ह्या वेळी थोडस ठरवूनच आणि मनाचा पक्का निर्धार करत रतनवाडी गाठलं. आणि रतनगडाच्या सौंदर्यात अक्षरशः हरवून गेलो.

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचणार कसे?
रतनगड हा अहमदनगर जिल्ह्यात असून, नाशिक जिल्यातील घनचक्कर रांगेत येतो.
नाशिक पासूनचे अंतर १२० किलोमीटर आहे. पुण्यापासून 183 आणि मुंबई पासून 197 किलोमीटर आहे. रस्ता अतिशय खराब असून, प्रयत्न हाच असुद्या की तुम्ही कार ने ह्या ठिकाणी याल. ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी रतनवाडी नावाचे गाव आहे.

२) किल्ल्याची भौगोलिकदृष्ट्या माहिती:-
★उंची:- ४२५५फूट
★श्रेणी:- मध्यम
★ डोंगररांग:- कळसुबाई

३) किल्ल्याचा इतिहास:-
इ.स १३६० मध्ये महादेव कोळी नाईक
इ.स १४०० मध्ये जव्हारचे नेमशाह
इ.स १४९० मध्ये मलिक अहमद
इ.स १६३० मध्ये माहुलीच्या तहात मुघलांना देण्यात आला.
इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांच्या उत्तर मोहिमे अंतर्गत जिकण्यात आला
इ.स १६६४ मध्ये सुरतेवरून परतताना महाराजांनी येथे आश्रय घेतला.

४) किल्ल्यावर काय-काय पाहणार?
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रतनवाडीत अमृतेश्वर हे अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे, त्याच्याच शेजारी पुष्करणी आहे. रतनवाडी पासून साधारणतः ३ तास चालल्या नंतर आपण किल्ल्यावर पोहचतो. वाटेत घनदाट जंगल , प्रवरा नदीच पात्र काही कातळकड्यात कोरलेल्या पायऱ्या आणि वनविभागाने तयार केलेले लोखंडी जिने लागतात, पहिल्या प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गणपती तयार केलेला आढळतो. पहिल्या प्रवेशद्वारातून आत मध्ये गेल्यानंतर दोन वाटा लागतात ह्यात लोखंडी जिना चढल्या नंतर उजवीकडची वाट गुहे कडे नेते आणि डावीकडे 
५) काही क्षणचित्रे
६) किल्ल्याचा संपूर्ण माहितीपट आपल्या youtube चॅनेल वर...

No comments:

Post a Comment

रांजणगिरी किल्ला

त्रंबकेश्वर डोंगररांग म्हणजे निसर्ग सौंदर्याचा निखळ झराच समजा की, इतके छान छान किल्ले आणि विलोभनीय दृश्याने भरलेला हा परिसर आपल्याला प्रेमात...