Wednesday, February 10, 2021

रामशेज किल्ला

नाशिकपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला आणि प्रत्येकाच्या हृदयात वसलेला असा किल्ला “किल्ले रामशेज”.
जितका लहान हा किल्ला आहे, तितकाच मोठा आणि अभिमानास्पद असा इतिहास आहे ह्या किल्याचा...
देवी मंदिराच्या समोरचा पुरातन गणपती 

★किल्ल्याबद्दल थोडक्यात:-

१) पोहचणार कसे?
नाशिकपासून पश्चिमेकडे १५ किलोमीटर अंतरावर आहे किल्ले रामशेज. कुठल्याही खाजगी वाहनाने साधारण पाऊण तासात नाशिक पासून आशेवाडी (रामशेजच्या पायथ्याचे गाव) गाठता येतो.

२) भौगोलिकदृष्ट्या:-
उंची :- समुद्ररसपाटीपासून ९८५ मीटर 
श्रेणी:- सोप्पी
डोंगररांग:- नाशिक उपरांग (वायव्य)
 जाण्यासाठी उत्त्त्तम कालावधी:- जून ते मार्च

★किल्ल्याचा इतिहास:-
ह्या किल्ल्याबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की प्रभू श्रीराम जेव्हा श्रीलंकेत जात होते त्यावेळेला इथे वास्तव्य केलं, थोडक्यात रामाची शैय्या म्हणून रामशेज म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर यााउरंगजेबाने जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इस १६८२ ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) नावाचे किल्लेदार होते. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. ते रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.

शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार (अज्ञात.. किल्लेदारावरून बरेच मतभेद आहेत) ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता. मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.

संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.

मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ८०-९० तोफा आणि 200 सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला. (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात). या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश येत नव्हते.

पूर्ण माहितीकरिता वाचा हा ब्लॉग 

रामशेज हिंदी मध्ये

★काही छायाचित्रे:-

वैशिष्यपूर्ण दरवाजा

शिििलालेख

दरवाजा
रामशेज
महाराजांची मूर्ती
पाण्याचं टाकं

★किल्ल्यावर काय-काय पाहणार:-

किल्ल्यावर प्रवेश होण्याआधी उजव्या हाथाला एक गुहा लागते, ज्याचा पाणी साठवण्याव्यतिरिक्त पाहणी करता देखील वापर केला जायचा. याच गुहेत एक शिवलिंग देखील ठेवलेले आहे. थोडस पुढे चालून गेल्या नंतर आपल्याला प्रभू श्रीरामाचे मंदिर लागते याच मंदिराच्या पहिल्या भिंतीवर शिलालेख आहे आणि शेवटच्या भिंतीशेजारी पाण्याच टाकं आहे. इथे पाणी आपण पिऊ शकतो. या पुढे काही पाऊले चढून गेल्यानंतर आपण एक उद्धवस्त दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करतो.

गडमाथा म्हणजे एक प्रशस्त अस पठार आहे. दरवाज्याच्या समोरच एक महिरफ असलेला दरवाजा दिसेल त्यातून थोडं खाली उतरलो की एक खांब असलेलं टाकं बघायला मिळेल. प्रवेश दरवाज्याच्या उजव्या हाथाला एक उंचवटा आहे.आणि डाव्या बाजूला एक विस्तीर्ण पठार. याच बाजूला उंच असा ध्वजस्तंभ आहे, आणि 2 पाण्याच्या टाक्या आहेत. उजव्या बाजूला उंचवट्या कडे जाताना चुन्याचा घाणा दिसतो. ह्याच बाजूला एक देवीचं मंदिर आहे आणि ह्याच मंदिराच्या समोर गणपतीची पुरातन मूर्ती आहे. पुढे ५ पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे, ह्याच बाजूला किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला पेठ हायवे कडे चोर दरवाजा आहे जो नक्की पहावा, किल्ल्याच्या पश्चिमेला पाण्याच्या अजून ५  टाक्या आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर highest point ला देखील पाण्याच्या 3 टाक्या आहेत आणि येथूनच पाणी खालच्या बाजूला जाण्याकरता वाट करून दिलेली दिसते..


★महत्वपुर्ण टीप:-

किल्ल्यावर जाताना पाण्याची सोय करून घ्यावी आणि स्वच्छता राखावी.


★किल्ल्याविषयीचा आपला व्हिडीओ

No comments:

Post a Comment

रांजणगिरी किल्ला

त्रंबकेश्वर डोंगररांग म्हणजे निसर्ग सौंदर्याचा निखळ झराच समजा की, इतके छान छान किल्ले आणि विलोभनीय दृश्याने भरलेला हा परिसर आपल्याला प्रेमात...