●किल्ल्याबद्दल थोडक्यात:-
★पोहचणार कसे:-
नाशिकहून वणी- बाबापूर- मुळाणे हे गाव गाठावे. (एकूण अंतर ७०किलोमीटर)
★किल्ल्याची उंची:-
1) रवळ्या:- ४०५५ फूट
2) जवळ्या:- ४३६९ फूट
★किल्ल्यांची श्रेणी:-
मध्यम स्वरूपातील
★डोंगररांग :- सातमाळ
★किल्ल्यांचा प्रकार :- गिरिदुर्ग
★स्थान:- मुळाणे,कळवण तालुका, नाशिक जिल्हा
★इतिहास
ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये “रोला-जोला” असा उल्लेख आढळतो.१६७० मध्ये शिवाजी महाराजांकडे हा किल्ला होता. १८१८ मध्ये हे किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि १८१९ मध्ये जवळ्या किल्ल्याच्या पायऱ्या आणि तटबंदी तोफा लावून उध्वस्त करण्यात आल्या.
★ किल्ल्यावर काय-काय पाहणार?
१)रवळ्या किल्ल्यावर:-
रवळ्याच्या कातळकड्या खाली अपूर्ण अवस्थेत सोडुन दिलेल्या काही गुहा आहेत. कातळकड्या खालीच एक सुप्त स्वरूपात पाण्याचं टाक आहे. कातळकडा चढताना थोड्या-फार पायऱ्या लागतात ज्यांची अवस्था इतकी काही छान नाही. काही पायऱ्या चढल्यावर एक दरवाजा लागतो, ज्याच्या उजव्या बाजूला एक शिलालेख आहे. दरवाजा आणि त्या मध्ये असणारा तीव्र चढ आपल्याला खूप मजेदार अनुभव देतो. दरवाजा चढल्यावर डाव्या हाताला गुहा आहेत, पाण्याचं टाक आहे. किल्ला म्हणजे विस्तीर्ण पठार आहे. वर पाण्याच्या टाक्या आहेत, घोड्याच्या पागा आहेत. किल्ल्यावरून धोडप, इखारा, कण्हेरगड, कंचना, इंद्राई हे किल्ले दिसतात.
२) जवळ्या किल्ल्यावर
हा किल्ला चढताना सुरवातीलाच उजव्या हाताला एक गुहा आहे आणि मुख्य आकर्षण म्हणजे एक घळीतून वाट निघत “चिमणी क्लाइंम्ब” करावं लागतं, फार मज्जा आली इथेतर.. पुढे कडा चढण्याकर्ता दोर बांधलेला आहे सहजगत्या हा पॅच चढता येतो जर गिर्यारोहणाचा अनुभव असेल तर. गडमाथ्यावर काहीही अवशेष नाहीत. पाण्याच टाक मात्र नक्की पहायला मिळत ज्यात पिण्याजोग पाणी नाही.
★महत्वाची टीप
हे किल्ले मध्यम श्रेणीतील असले तर वाट आणि चढण अंगावर येणारी आहे. आणि घनदाट जंगल देखील आहे, ह्या व्यतिरिक्त खूप साऱ्या ढोरवाटा देखील आहेत. म्हणूनच कुणा तरी जाणकाराला अथवा वाटाड्याला सोबत नक्की घेऊन जा..
★आपल्या youtube व्हिडिओची लिंक:-
No comments:
Post a Comment